वापराच्या अटी

PrintPrintEmail this PageEmail this Page

प्रस्तावना

इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी लि. ने त्यांच्या ऑफर, उत्पादने आणि सेवांबद्दलची माहिती पुरविण्यास व जनसामान्यांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी या वेबसाईटची रचना केली आहे. आपण अटी आणि नियमांचे अनुपालन करत असल्यास या वेबसाइटचा वापर करू शकता.

या अटी आणि नियमांकरीत आपले स्वीकरण.
कृपया या अटी व नियमांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्यासाठी काही मिनिटे द्या. या वेबसाइटवर प्रवेश करुन आणि वापरुन आपण या अटी आणि नियमांचे अनुसरण करण्यास बाध्य आहात. आपण या अटी आणि नियमांचे अनुसरण करण्यास आणि त्यास बंधनकारक नसल्यास, आपण या वेबसाइटव प्रवेश,सामग्री वापर किंवा डाउनलोड करू शकणार नाही.

हे नियम व अटी बदलू शकतात
इफको टोकियो कोणत्याही पूर्वसूचनाशिवाय कोणत्याही वेळी या अटी आणि नियमांचे अद्ययावतन किंवा फेरफार करण्याचा अधिकार राखून आहेत. अशा कोणत्याही प्रकारच्या बदलांसाठी या वेबसाईटचा तुमचा वापर आणि बदलल्यानुसार अटी व शर्तीसाठी तुम्ही बंधनकारक आहेत. या कारणास्तव, प्रत्येक वेळी या वेबसाइटचा वापर करताना या अटी व शर्तींचे पुनरावलोकन करण्यास आम्ही आपल्याला प्रोत्साहित करतो. या अटी आणि शर्तीची गेल्या वेळी 25 सप्टेंबर 2005 रोजी सुधारित करण्यात आली होती.

कॉपीराइट सूचना आणि मर्यादित परवाना
आपण या साइटवर पाहत, वाचत किंवा ऐकत असलेली प्रत्येक गोष्ट (सर्व सामग्री ),उदाहरणार्थ मजकूर, संचयीका, छायाचित्रे , स्पष्टीकरण, ग्राफिक्स, ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स भारतीय कायदे आणि लागू असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायदे आणि करार तरतुदी नुसार कॉपीराइट केलेल्या आहेत. या सामग्रीमधील कॉपीराईट्स ची मालकी इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड किंवा त्याच्या सहयोगी कंपनीपैकी एकाची किंवा तृतीय पक्षांची आहे ज्यांनी इफको टोकियोला आपल्या सामग्रीचा परवाना दिलेला आहे. या साइटवरील संपूर्ण सामग्री भारतीय कायद्यांतर्गत आणि लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉपीराइट कायदे आणि करार यांचे सामूहिक कार्य म्हणून कॉपीराइट करण्यात आलेली आहे. सामग्री निवड, समन्वय, व्यवस्था आणि वाढ याचे कॉपीराइट इफको टोकियो कडे आहेत.

आपण या साइटच्या सामग्रीचे निवडक भाग डाउनलोड, संग्रहित , मुद्रित आणि नकल करू शकता, जर आपण :

डाउनलोड केलेली सामग्री केवळ आपल्या वैयक्तिक, अव्यावसायिक वापरासाठी किंवा इफको टोकियोसह आपले व्यवसायासंबंधी व्यवहार वाढविण्यास वापरत आहात .

इफको टोकियोची अग्रिम लिखित मंजूरी न घेता कोणत्याही अन्य इंटरनेट साइटवर सामग्रीचा कोणताही भाग प्रकाशित किंवा पोस्ट करू नये.

इफको टोकियोची अग्रिम लिखित मंजूरी न घेता कोणत्याही मीडियामध्ये किंवा मीडियावर सामग्रीचा कोणताही भाग प्रकाशित किंवा प्रसारित करू नये.

कोणत्याही प्रकारे सामग्री सुधारू किंवा बदलू नका किंवा कोणतीही कॉपीराइट किंवा ट्रेडमार्क सूचना किंवा गोपनीयतेच्या सूचना हटवू किंवा सुधारू नका.

आपण या साइटवरून सामग्री डाउनलोड करता तेव्हा डाउनलोड सामग्रीमधील कोणतेही अधिकार, शीर्षक किंवा फायदा आपल्याला हस्तांतरित केले जात नाही. या साइटवरून आपण डाउनलोड करीत असलेल्या कोणत्याही सामग्रीमधील सर्व बौद्धिक संपत्ती अधिकारांचे रक्षण आणि ठेवण इफको टोकियो राखून आहे.

वर स्पष्टपणे म्हटल्याशिवाय इफको टोकिओची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय या साइटच्या सामग्रीचा आपण नकल, डाउनलोड, मुद्रण , प्रकाशन , प्रदर्शित, प्रदर्शन, वितरण, प्रसार, हस्तांतरण, भाषांतरण, सुधारणा, जोडण, अद्ययावतन , संकलन, संक्षेपण किंवा कोणत्याही अन्य प्रकारे परिवर्तन किंवा संपूर्ण सामग्री वा त्याच्या काही भागाचे अवलंबन करून घेऊ शकत नाही.

ट्रेडमार्क सूचना
या वेबसाईटवर प्रदर्शित सर्व ट्रेडमार्क्स, सर्व्हिस मार्क्स आणि लोगो ("हे ट्रेडमार्क") इफको टोकिओचे किंवा त्याच्या संलग्नतेपैकी एकाचे नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत किंवा तिसऱ्या पक्षांचे आहेत ज्यांनी आपल्या ट्रेडमार्कचे इफको टोकिओला परवाने दिलेले आहेत. या अटी व शर्तींमध्ये स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय आपण प्रथम इफको टोकियो च्या लिखित परवानगी प्राप्त न करता कोणत्याही ट्रेडमार्कचे पुनरूत्पादन, प्रदर्शन किंवा अन्यथा वापरू शकणार नाही. आपण या वेबसाईटच्या कार्यान्वयना मध्ये परिणाम करणे / व्यत्यय आणणे किंवा परिणाम करणे / व्यत्यय आणणे याचा प्रयास करणे यास आपण सहमत आहात.

अवांछित कल्पना
इफको टोकियो या वेबसाइटबद्दल आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाचे स्वागत करते. या वेबसाईटद्वारे इफको टोकियोला सादर केलेल्या टिप्पण्या, कल्पना, प्रश्न, डिझाइन आणि तत्सम सर्व माहिती आणि साहित्य हे गैर-गोपनीय आणि गैर-प्रचाराचे मानले जाईल. या कारणास्तव, आम्ही आपल्याला कोणतीही गोपनीय माहिती किंवा उत्पादन कल्पना, संगणक कोड किंवा मूळ कलाकृती यासारखी कोणतीही मूळ क्रिएटिव्ह सामग्री यासारखी कोणतीही माहिती किंवा साहित्य आम्हाला आमच्याकडे पाठवू नये अशी विनंती करतो.

इफको टोकियोला या वेबसाईटद्वारे माहिती किंवा साहित्य सादर करून, तुम्ही इफको टोकियोला, सर्व जगभरातील अधिकार, शीर्षक आणि सर्व कॉपीराईट्समधील फायदा आणि आपण सादर केलेल्या माहिती किंवा साहित्यामधील इतर बौद्धिक संपत्ती अधिकार नियुक्त करता. या वेबसाईट द्वारे आपण सादर केलेल्या कोणत्याही माहितीचा किंवा साहित्यांचा उपयोग कोणत्याही कारणास्तव निर्बंधा शिवाय आणि कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई न देता इफको टोकियोला वापरण्याचा हक्क असेल.

जागतिक उपलब्धता
कारण जगभरातील विविध देशांमध्ये भिन्न कायदे आणि नियामक आवश्यकता आहेत, काही विमा उत्पादने आणि पद्धती / सेवा काही देशांमध्ये उपलब्ध आहेत आणि इतरांमधे नाही. या साइटमध्ये इफको टोकिओचे उत्पादने, कार्यक्रम आणि सेवांचे संदर्भ किंवा प्रती संदर्भ आहेत जी आपल्या देशामध्ये उपलब्ध नाहीत किंवा जाहीर केलेले नाहीत. इफको टोकियो आपल्या देशात अशा उत्पादने, कार्यक्रम किंवा सेवांची घोषणा करण्याचा विचार करत आहे असा ह्याचा संदर्भ नाही. आपल्यासाठी कोणते उत्पादने, कार्यक्रम आणि सेवा उपलब्ध असू शकतात याबद्दल आपल्याला प्रश्न असल्यास इफको टोकियो शी संपर्क साधा.

उत्तरदायित्वाच्या मर्यादा
या वेब साइटचा आपला वापर संपूर्णपणे आपल्या जोखीमांवर आहे. कोणत्याही परिस्थितीत, इफ्को टोकियो, त्याच्या संबंधित किंवा त्यांच्या नियामक संचालक, अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट यांच्यापैकी कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान किंवा अपघातामुळे किंवा या वेब वापरासाठी आपल्या उपयोगाच्या किंवा अपुरेपणाशी संबंधित असलेल्या हानीसाठी, वेब साइटवर प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीवर व त्यावर आपला विश्वास याला जबाबदार नसतील. ही उत्तरदायित्वाची व्यापक मर्यादा असून ते कोणत्याही प्रकारचे हानी किंवा नुकसान , जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष , सामान्य, विशिष्ट, आकस्मिक, परिणामस्वरुप, अनुकरणीय किंवा अन्यथा, मर्यादित न राहता, डेटा गमावणे, महसूल किंवा नफा याला लागू होईल. उत्तरदायित्वाची ही मर्यादा लागू असल्यास उपरोक्त उत्तरदायित्व करार, निष्काळजीपणा, हानी, कठोर उत्तरदायित्व किंवा अन्य कोणत्याही आधारावर आधारित आहे आणि तरीही इफको टॉकियोच्या अधिकृत प्रतिनिधीने किंवा त्याच्या समूहाला सल्ला देण्यात आला किंवा अशा संभाव्य नुकसानाची शक्यता असल्याची माहिती असणे आवश्यक आहे .

काही राज्य उपरोक्त उत्तरदायित्वाच्या मर्यादा मंजूर करत नाहीत, तर उत्तरदायित्वाची ही मर्यादा आपल्यावर लागू होत नाही. जर ह्या दायित्वाच्या मर्यादेचा कोणताही भाग कोणत्याही करणावास्तव अप्रवर्तनीय किंवा अवैध आढळ्यास, इफको टोकियो आणि / किंवा त्याच्या संलग्नतेची एकूण जबाबदारी अश्या कोणत्याही परिस्थितीत जबाबदारीसाठी ज्या अन्यथा मर्यादित असल्या असत्या त्या (रु. .100.00)पेक्षा अधिक नसतील.

नियमन कायदा आणि कार्यक्षेत्र
ही वेबसाईट भारतातील इफको टॉकीओ कार्यालयांद्वारे नियंत्रित आणि संचलित करण्यात येते. वेबसाईट संबंधीचे कोणतेही दावे आणि तिचा वापर, भारतीय कायद्यांच्या अंमलबजावणी नुसार होते.

संपूर्ण करार
हा करार आपल्या आणि इफको टॉकओच्या संपूर्ण वेबसाईटच्या ऍक्सेस आणि / किंवा वापरासंदर्भात संपूर्ण करार आहे.


Download Motor Policy

Feedback