IDV (आयडीव्ही) म्हणजे विमाधारक घोषित मूल्य. वर्तमान उत्पादकांच्या सूचीबद्ध विक्री दारासह टेरिफ मध्ये नमूद घसारा टक्केवारीने समायोजन करून गाडीचे मूल्य निर्धारित केले जाते. अप्रचलित आणि 5 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वाहनांसाठी, आयडीव्ही हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्या दरम्यान मान्य झालेल्या मूल्यानुसार असेल.
उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत = किंमत + स्थानिक शुल्क / कर, नोंदणी आणि विमा वगळता
आयएमए, सर्वेक्षकांचे पॅनेल, कार डीलर्स, सेकंड हॅन्ड कार डीलर्स इ. विविध स्रोतांच्या मदतीने अप्रचलित वाहनांचे आणि ५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांचे मूल्य आमच्या मूल्यांकन गटाद्वारे करण्यात येईल .