वाहन पॉलिसी संरक्षणे कोणती आहेत?

PrintPrintEmail this PageEmail this Page

आपल्या गाडीचे नुकसान - ही पॉलिसी मानव निर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या गाडीला होणाऱ्या हानी किंवा क्षति साठी किंवा त्याच्या सामानाला होणाऱ्या नुकसानीसाठी आपल्यास संरक्षण देते.

(i) वैयक्तिक अपघात संरक्षण - हे वाहन विमा वाहनाच्या वैयक्तिक मालकांसाठी अनिवार्य अपघात संरक्षण पुरवतो, हे वैयक्तिक अपघात संरक्षण रू. 2 लाख पर्यंत असू शकतो.  

आपण प्रवाशांसाठी वैयक्तिक अपघात संरक्षण देखील निवडू शकता. जास्तीत जास्त रु. 2 लाखापर्यंत संरक्षण देऊ केले जाऊ शकते.

तृतीय पक्ष कायदेशीर उत्तरदायित्व - ही पॉलिसी खालील गोष्टींसाठी वाहनाच्या मालकांच्या कायदेशीर नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीस समाविष्ट करते:

  • तृतीय पक्षाच्या व्यक्तीस मृत्यू किंवा शारीरिक दुखापत.
  • तृतीय पक्षाच्या मालमत्तेस नुकसान

मृत्यू किंवा दुखापत आणि तृतीय पक्षाच्या मालमत्तेस नुकसानीकरिता व्यावसायिक आणि खासगी वाहनांअंतर्गत रू .7.5 लाखांची आणि स्कूटर्स / मोटर सायकल्ससाठी 1 लाखाची अमर्यादित रकम दायित्वासाठी समाविष्ट आहे. 


Download Motor Policy

Feedback