माझे नियोक्ता मला आरोग्य विम्याचे संरक्षण देतात. मी स्वतःहून दुसरी पॉलिसी घेणे हा सल्ला दिला जातो का?

PrintPrintEmail this PageEmail this Page

निरंतरतेच्या कारणांमुळे आपल्या स्वतःचा आरोग्य विमा असावा अशी शिफारस केली जाते. सर्वप्रथम, आपण आपले काम बदलल्यास, आपल्याला आपल्या नवीन नियोक्त्याकडून आरोग्य विमा मिळेलच असे नाही. कोणत्याही परिस्थितीत आपण रोजगार बदलीच्या दरम्यान आरोग्य खर्चाला सामोरे जाऊ शकता. दुसरे म्हणजे, आपण आपल्या जुन्या नियोक्त्याच्या आरोग्य विम्यामध्ये सादर केलेला ट्रॅक रेकॉर्ड नवीन कंपनीच्या पॉलिसीमध्ये स्थानांतरित होणार नाही. आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजाराचे संरक्षण करणे ही समस्या असू शकते. बहुतेक पॉलिसींमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारानां  फक्त 5 व्या वर्षापासूनच संरक्षण  दिले जाते. म्हणून वरील समस्या टाळण्यासाठी, आपल्या कंपनीने दिलेल्या ग्रुप आरोग्य विमा पॉलिसि व्यतिरिक्त खाजगी पॉलिसी घेणे सुचवले जाते. 


Download Motor Policy

Feedback