PrintPrintEmail this PageEmail this Page

सर्व विमा करार हे प्रस्ताव अर्जामध्ये विमा उतरविलेल्या व्यक्तीद्वारे प्रदान केलेल्या माहितीच्या आधारावर आहेत. प्रस्ताव अर्ज विमा करारांची रचना करतो.

पॉलिसींच्या विविध स्वरूपाच्या दृष्टीकोनातून, उपरोक्त वैयक्तिक पॉलिसींच्या व्यतिरिक्त विशिष्ट गुण खालीलप्रमाणे आहेत: (कृपया लक्षात ठेवा की उल्लेख केलेली दस्तऐवजे निदर्शनास आहेत आणि दाव्याच्या परिस्थितीनुसार, विमाकर्ता अतिरिक्त दस्तऐवजांसाठी विनंती करु शकतो)

PrintPrintEmail this PageEmail this Page

आपण आरोग्य विमा दाव्यासाठी २ पद्धतींनी अर्ज करू आपण एकतर कॅशलेस दावा करू शकता किंवा आपल्या दाव्यासाठी परतफेड मिळवू शकता. खाली अनुसरण करण्‍यासाठी प्रक्रिया दिलेल्या आहेत:

कॅशलेस दाव्यांची सुविधा केवळ आम्ही ज्यांच्याशी बद्ध आहोत अशा टीपीएचे जोडलेल्या इस्पितळांमध्ये उपलब्ध आहे.  आपण भरती होण्यापूर्वी आमच्या टीपीए कडून कोणत्याही विशिष्ट इस्पितळाच्या वर्तमान नेटवर्क स्थितीबद्दल समजून घेण्यासाठी सल्ला दिला जातो.

सुविधे अंतर्गत नेटवर्क इस्पितळ कॅशलेस विनंतीशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात आपल्याला सहाय्य करेल.   आपण आपल्या आरोग्य कार्डावर दिलेल्या सदस्यता क्रमांकासह आमच्या तृतीय पक्ष प्रशासकाशी त्यांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क देखील करू शकता.

कॅशलेस दावे दोन प्रकारचे आहेत:

 • आणीबाणी प्रवेशासाठी कॅशलेस दाव्यांची प्रक्रिया
 • योजनाबद्ध प्रवेशासाठी कॅशलेस दाव्यांची प्रक्रिया

आणीबाणी प्रवेशासाठी कॅशलेस दाव्यांची प्रक्रिया:

 • चरण 1: नेटवर्क इस्पितळाच्या प्रकरणी, प्रवेश केल्यावर, तृतीय पक्ष प्रशासकास (टीपीए) ला त्यांच्या टोल फ्री क्र. वर सूचित करा. कृपया आपल्या आरोग्य कार्ड सदस्यता क्रमांकाचा उल्लेख करा
 • चरण 2: हॉस्पिटल इन्श्युरन्स हेल्प डेस्कवर उपलब्ध असलेला कॅशलेस विनंती अर्ज भरा आणि आपल्या उपचार करणार्‍या चिकित्सकाद्वारे तो प्रमाणिकृत करून घ्या
 • चरण 3: समर्थित वैद्यकिय नोंदींसह कॅशलेस विंनती अर्ज टीपीए ला फॅक्स करून पाठवा
 • चरण 4: टीपीए दस्तऐवजाची छाननी करुन हॉस्पिटलला निर्णय कळवेल. टीपीए कॅशलेस विनंती मंजूर करू शकतो किंवा आवश्यक असल्यास, अतिरिक्त दस्तऐवजाची मागणी करू शकतो.
 • चरण 5: टीपीए द्वारे कॅशलेस दाव्यास मंजूरी दिल्यानंतर इस्पितळातील बिले थेट सेटल केली जातील (पॉलिसी मर्यादांच्या अधीन आहे). टेलिफोन शुल्क, जेवण, पारिचारिका शुल्क इ. ची अग्राह्य रक्कम आपल्याद्वारे दिली जावी
 • चरण 6: जर कॅशलेस दावा टीपीए द्वारे मंजूर झाला नाही तर कृपया इस्पितळात बिल सेट करा आणि परतफेडीसाठी अर्ज करा. पॉलिसीच्या अटी आणि शर्तीनुसार दाव्याची प्रक्रिया केली जाईल

आमच्या टीपीए द्वारे कॅशलेस निर्णय मंजूर करण्यासाठीचा कालावधी हा सर्व दस्तऐजव प्राप्त झाल्यानंतर २४ तास असतो.

योजनाबद्ध प्रवेशासाठी कॅशलेस दाव्यांची प्रक्रिया

 • चरण 1: उपचारासाठी आमच्या नेटवर्क इस्पितळाच्या सूचीमधून एक इस्पितळ निवडा
 • चरण 2: आपल्या आरोग्य कार्ड सदस्यता क्रमांकाच्या उल्लेखासह, प्रवेशाच्या ३ दिवसांपूर्वी हेल्पलाइन क्रमांकाद्वारे आमच्या तृतीय पक्ष प्रशासकाला (टीपीए) सूचित करा
 • चरण 3: हॉस्पिटल इन्श्युरन्स हेल्प डेस्कवर उपलब्ध असलेला कॅशलेस विनंती अर्ज भरा आणि आपल्या उपचार करणार्‍या चिकित्सकाद्वारे तो प्रमाणिकृत करून घ्या
 • चरण 4: समर्थित वैद्यकिय नोंदींसह कॅशलेस विंनती अर्ज टीपीए ला फॅक्स करून पाठवा
 • चरण 5: टीपीए दस्तऐवजाची छाननी करुन हॉस्पिटलला निर्णय कळवेल. टीपीए कॅशलेस विनंती मंजूर करू शकतो किंवा आवश्यक असल्यास, अतिरिक्त दस्तऐवजाची मागणी करू शकतो.
 • चरण 6: टीपीए द्वारे कॅशलेस दाव्यास मंजूरी दिल्यानंतर इस्पितळातील बिले थेट सेटल केली जातील (पॉलिसी मर्यादांच्या अधीन आहे). टेलिफोन शुल्क, जेवण, पारिचारिका शुल्क इ. ची अग्राह्य रक्कम आपल्याद्वारे दिली जावी.
 • चरण 7: जर कॅशलेस दावा टीपीए द्वारे मंजूर झाला नाही तर कृपया इस्पितळात बिल सेट करा आणि परतफेडीसाठी अर्ज करा. पॉलिसीच्या अटी आणि शर्तीनुसार दाव्याची प्रक्रिया केली जाईल

आमच्या टीपीए द्वारे कॅशलेस निर्णय मंजूर करण्यासाठीचा कालावधी हा सर्व दस्तऐजव प्राप्त झाल्यानंतर २४ तास असतो.

दाव्याच्या परतफेडीसाठी प्रक्रिया

जर आपण नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ‍सुविधा घेतली नसेल किंवा आपण अशा इस्पितळात उपचार घेतले असतील जे नेटवर्कचा भाग नाही तर आपण परतफेडीसाठी आपले मूळ दस्तऐवज सबमिट करू शकता.

 • चरण 1: प्रवेश केल्यावर इफ्को-टोकिओला टोल फ्री क्रमांक - १८०० १०३ ५४९९ वर तात्काळ सूचित करा, इस्पितळातून सुट्टी झाल्यापासून ७ दिवसांनंतर नाही. कृपया दाव्याची सूचना देताना आपल्या पॉलिसी प्रमाणपत्राच्या क्रमांकाचा उल्लेख करा.
 • चरण 2: उपचार मिळवा आणि इस्पितळामध्ये सर्व बिले सेटल करा आणि त्यानंतर परतफेडीसाठी दावा दाखल करा.
 • चरण 3: आमच्या वेबसाइट वरून संबंधित दावा अर्ज डाउनलोड करा (किंवा) आमच्या कॉल सेंटरवर एका अर्जाची विनंती करा.

दाव्याची दस्तऐजवे स्थानिक इफ्को टोकिओ कार्यालयाच्या पत्त्यावर सबमिट देखील करू शकता जे आमच्या टोल फ्री क्रमांक 1800 543 5499 वर कॉल करून मिळविले जाऊ शकतात.

जर आपल्याला दाव्यांच्या प्रक्रियेवर मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आपण आमच्या टोल फ्री क्रमांक - 1800 543 5499 वर आमच्याशी संपर्क साधून शकता.

दस्तऐवज तपास सूची

दाव्याच्या परतफेडीच्या संदर्भात सबमिट केली जाणारी दस्तऐवजे - चिकित्सकाच्या प्रमाणपत्रासह योग्यरित्या भरलेला दाव्याचा अर्ज

 • इस्पितळातून सुट्टी घेतल्याचा सारांश
 • बिले
 • लिहून दिलेली औषधे
 • आगाऊ दिलेल्या रकमेची आणि अंतिम पावत्या
 • निदान चाचणी अहवाल, एक्स रे, स्कॅन आणि ईसीजी आणि इतर फिल्म्स

आवश्यक असल्यास दावा प्रक्रिया कार्यसंघ वरील सूचीबद्ध दस्तऐवजाच्या व्यतिरिक्त आणखी दस्तऐवजांची मागणी करेल.

कृपया लक्षात ठेवा:

 • दाव्याची पडताळणी केल्यानंतर आवश्यक दस्तऐवजे आणि अतिरिक्त दस्तऐवजे / माहिती प्राप्त झाल्यानंतर दाव्यांची प्रक्रिया केली जाईल.
 • दावा ग्राह्य असल्यास आपल्याला धनादेश पाठविला जाईल. जर नसेल, तर आपल्याला अस्वीकार केल्याचे पत्र पाठविले जाईल
 • दाव्याच्या परतफेडीसाठी कार्यवाहीचा कालावधी हा सर्व दस्तऐवज प्राप्त झाल्याच्या तारखेपासून २० दिवस आहे.

दाव्याचे देय

 • या पॉलिसी अंतर्गत येणारे सर्व दावे हे भारतीय चलनामध्ये देण्यात येतील. या विम्याच्या उद्देशाचे सर्व वैद्यकीय उपचार केवळ भारतात घेतले जातील.
 • आयआरडीए नियमनांनुसार प्रदान केलेल्या च्या व्यतिरिक्त पॉलिसी अंतर्गत द्यावयाचे देय किंवा दिले जाणार्‍या देयासाठी कोणतेही व्याज/दंड देण्यास इफ्को टोकिओ जबाबदार असणार नाही.
 • दावा ग्राह्य असल्यास दाव्याचे देय देण्याच्या वेळेस प्रस्तावकर्ता हयात नसल्यास प्रस्तावकर्त्याच्या कायदेशीर वारसा असलेल्या व्यक्तीस दिले जाईल.

PrintPrintEmail this PageEmail this Page

सर्व विमा करार विमादाराद्वारे प्रदान केलेल्या प्रस्ताव फॉर्मच्या माहितीवर आधारित आहेत. प्रस्ताव फॉर्म हा विमा कराराचा आधार ठरतो.

काही महत्त्वपूर्ण मुद्दे, जे आपल्याला दावा प्रक्रियेत मदत करतील.

 • नुकसान किंवा नुकसानाची माहिती लगेच विमा कंपनीकडे नोंदवावी.
 • दाव्याची सूचना प्राप्त झाल्यानंतर, विमाप्रदत दावा फॉर्म पुढे पाठवेल.
 • विमाप्रदात्याकडे नुकसानीच्या अंदाजासह पूर्ण झालेला दावा फॉर्म सादर करा. विभक्त मूल्यासह एक तपशीलवार सूचिबद्ध अंदाज सादर करणे अधिक श्रेयस्कर आहे.
 • विमा कंपनी नुकसानाचे आकलन करण्यासाठी नुकसान झालेल्या बाबींचे निरीक्षण करण्याची व्यवस्था करेल. मोठे नुकसान झाल्यास, एक विशेषज्ञ-परवानाकृत सर्वेक्षक नियुक्त केला जातो.
 • विमाधारकाने नुकसानाची व्याप्ती सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
 • जर नुकसानाचे कारण सिद्ध झाले नाही तर विमा उतरवलेल्या संकटामुळे ते नुकसान झाले आहे हे सिद्ध करणे विमाधारकाचे काम आहे.
 • विमाधारक आणि विमाप्रदाता यांच्यातील दावा रकमेच्या करारावर दाव्याचा निपटारा केला जातो.
 • पॉलिसीच्या अटी आणि शर्तीनुसार आणि त्यामध्ये नमूद केल्यानुसार जास्तीची रकम देय दाव्यातून वजा केली जाईल.

पॉलिसींच्या विविध स्वरूपाच्या दृष्टीकोनातून, वर नमूद केल्या व्यतिरिक्त, व्यक्तिगत पॉलिसींपेक्षा वेगळ्या विशिष्ट बाबी खाली नमूद केल्या आहेत: (कृपया लक्षात घ्या की उल्लेख केलेले दस्तऐवज सूचक आहेत आणि दाव्याच्या परिस्थितीवर आधारित आहेत , विमाप्रदाता अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करणे शक्य आहे)

मोटर वाहन (खाजगी व दुचाकी वाहने) दावे

वाहन पॉलिसींअंतर्गत दावे

 • अपघाताची सूचना (दावा असणे आवश्यक नाही ) ज्यामध्ये तिसऱ्या पक्षांचा समावेश असेल , ते विमाप्रदात्यांना कळवावे.
 • विमाप्रदत पैसे देण्यास जबाबदार आहे किंवा नाही याखेरीजही नुकसान भरपाई देण्यास इच्छुक असू शकतो. म्हणूनच पॉलिसीची एक स्पष्ट अट आहे की विमाप्रदाताच्या परवानगीशिवाय कोणताही दावा दाखल केला जाणार नाही किंवा तडजोड होणार नाही.
 • बहुतांश दाव्यांच्या बाबतीत, विमा कंपनी ड्राइवरच्या विरूद्ध गुन्हेगारी खटल्यात बचाव करण्यास तयार असू शकते तसेच ह्या आधारावरही कि सिव्हिल कोर्टात मोबदल्याच्या दाव्यांचा कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो.
 • तिसऱ्या पक्षांचा समावेश असलेल्या प्रत्येक दुर्घटनेची तक्रार पोलिसांकडे करणे आवश्यक आहे. एम.व्ही.एक्ट देऊ करते की तृतीय पक्ष बळी विमाधारकांविरूद्ध थेट जाऊ शकतो. जर कथित अपघात विमाप्रदतला कळविला नसला तर विमाप्रदाता यास पॉलिसीच्या स्थितीचे उल्लंघन मानू शकतात. अशा परिस्थितीमध्ये, विमा कंपन्यांनासुद्धा न्यायालयीन कायद्याने नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता असू शकते, तरीही विशिष्ट पॉलिसी अट चे उल्लंघन झाल्यास विमाधारकांकडून अशा दाव्याची रक्कम वसूल करण्याचा त्यांच्याकडे पर्याय आहे.

       Procedure
एखाद्या अपघाताच्या बाबतीत घ्याव्याची पाऊले :

 • इफको-टोकियो जनरल इन्शुरन्सच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 103 54 99 अपघाताची सूचना द्यावी.
 • जर नुकसान मोठा असेल , तर वाहनला जागेवरून हलवण्यापूर्वी अपघाताची सूचना द्यावी जेणेकरून विमाप्रदाता नुकसानाच्या जागी तपासणीसाठी व्यवस्था करु शकतील.
 • गाडी नंतर दुरुस्ती शुल्काचा अंदाज घेण्यासाठी प्राधान्याने अधिकृत कार्यशाळेत हलविली जाऊ शकते.
 • पूर्ण झालेल्या दावा फॉर्म आणि दुरुस्तीचा अंदाज मिळाल्यानंतर विमाप्रदाता नुकसानीच्या विस्तृत तपासणीसाठी व्यवस्था करतील व दुरुस्तीच्या खर्चाची निश्चिती करतील.
 • विमा प्रदाता याची खात्री करतील की योग्य परवाना धारक व्यक्ती अपघाताच्या वेळेस वाहन चालवित होता आणि ते वाहन त्यांच्या नोंदणी पुस्तकाप्रमाणे विमा केलेला आहे . या शेवटी, ते अपघाताच्या वेळी गाडी चालविणार्या चालकाच्या नोंदणी प्रमाणपत्र आणि चालक परवान्याची पडताळणी करतील.
 • उपरोक्त प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर , दुरूस्तीकर्त्यांना दुरूस्ती करण्याची परवानगी असेल. विमाप्रदता दुरुस्ती बिले थेट गॅरेजला देण्याचे ठरवतील किंवा विमाधारकाला परतफेड करतील.

स्वतःच्या नुकसानीच्या दाव्यासाठी काय करावे?

 • अपघाताच्या बाबतीत - एखाद्याला इजा झाली असेल तर वैद्यकीय काळजी देण्याची व्यवस्था करावी. जर इतर वाहनांचा / लोकांचा समावेश असेल तर त्यांचा तपशील घ्या. कृपया अपघातासाठी कोणतीही निष्काळजीपणा स्वीकारू नका आणि नुकसान भरपाईबद्दल कुणाशीही बांधिलकी करू नका.
 • इजा, मृत्यू, तृतीय पक्ष मालमत्ता नुकसान, घरफोड्या, चोरी, घरात घुसणे आणि दुर्भावनायुक्त कृती द्वारे नुकसान , दंगा, संप आणि दहशतवादी कारवायामुळे नुकसान झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात त्वरित माहिती देणे आवश्यक आहे.
 • अपघाताचे स्वरूप गंभीर असल्यास आणि वाहन हलवता येत नसल्यास , त्या जागेवर वाहनचे योग्य संरक्षण सुनिश्चित करा. अपघातानंतर आणि आवश्यक दुरुस्ती करण्यापुर्वी कृपया इंजिन सुरू करण्याचे प्रयत्न किंवा वाहन चालविण्याचा प्रयत्न करू नका.
 • वाहन आपल्या निवडीच्या नजीकच्या गॅरेजमध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था करा आणि त्यांना सविस्तर अंदाज तयार करण्यासाठी सांगा (मजुरीचे शुल्क त्याच्या भागांच्या यादीसह त्यांचे मूल्य)
 • जो पर्यंत सर्वेक्षकाद्वारे सर्वेक्षण / मूल्यांकन होत नाही तोपर्यंत कृपया वाहनाची दुर्घटना स्थिती मोडू नका किंवा बदलू नका. तसेच, कोणत्याही वेळी कोणतेही भाग किंवा उपकरणे गहाळ होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी.
 • आम्हाला ताबडतोब अपघात किंवा नुकसानाबद्दल सूचित करा.
 • कृपया आम्हाला योग्य / पूर्णपणे भरलेल्या दाव्याचे फॉर्म सादर करा.
 • अशा प्रकारच्या दुरुस्ती करणाऱ्याला आमच्याकडून थेट देयक सुविधेचा लाभ घेण्यासाठी व कॅशलेस सुविधावर मार्गदर्शनासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.
 • पडताळणी आणि परताव्यासाठी सादर करण्याची कागदपत्रे(फोटो कॉपीच्या संचसह)
 • मूळ वाहन नोंदणी पुस्तक (योग्यता प्रमाणन समाविष्ट करून, जर तो वेगळा दस्तावेज असेल तर)
 • मूळ चालक परवाना.
 • सादरीकारणासाठी दस्तऐवजीकरण
 • पोलिसांच्या तक्रारीची प्रत (एफआयआर)
 • दुरूस्तीचा अंदाज.
 • आपल्या दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही अतिरिक्त कागदपत्रे किंवा स्पष्टीकरण मागू शकतो आणि ते दाव्यावर अवलंबून आहे. कृपया हे सादर करण्याची व्यवस्था करा.
 • सर्व नुकसान / तोट्याचे सर्वेक्षण/मूल्यांकन सर्वेक्षणका / निर्धारकाद्वारे केले जातील आणि दाव्याची स्वीकारार्हता आणि समझोत्याच्या पद्धतीची प्रक्रिया झाल्यानंतरच निश्चित करण्यात येईल.

कृपया लक्षात ठेवाःतुम्ही आम्हाला योग्य आणि संपूर्ण संपर्क तपशील देत आहात याची खात्री करा (दाव्याच्या फॉर्ममध्ये पत्ता / दूरध्वनी क्रमांक / मेल आयडी देऊ शकता). जर तुम्हाला अपघाताच्या संदर्भात नोटीस किंवा फर्मान मिळाले असतील (गुन्हेगारी कारवाईव्यतिरीक्त अन्य असल्यास) याचिका प्रतसह आम्हाला संपर्क करा.

चोरीच्या दावा प्रकरणी काय करावे?

 • आपली कार चोरीला गेल्यास, पहिली गोष्ट म्हणजे पोलीसांकडे तक्रार दाखल करणे.
 • पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर लगेच आपल्या विमा कंपनीला सूचित करा, ह्यामुळे चोराने आपल्या कारसह इतरांना काही नुकसान केले असल्यास मदत होईल. तसेच कृपया लक्षात ठेवा कि जर आपण पोलिसांकडे तक्रार नोंदवली नसेल तर आपली विमा कंपनी आपल्या दाव्यावर प्रक्रिया करणार नाही.
 • जेव्हा आपण आपल्या विमा कंपनीला सूचित कराल , तेव्हा त्यांना एफआयआर सोबत आपल्या कारच्या मुदतीची / कर्जाची सर्व तपशीलवार माहिती द्या.
 • त्यांना आपली गाडी, मायलेज, सेवा नोंदी असल्यास त्याबद्दल वर्णन द्या. त्याचसह कार सोबत चोरीला गेलेल्या वैयक्तिक वस्तूंची यादी देखील सादर करा.
 • चोरीबद्दल आरटीओला कळविणे देखील महत्वाचे आहे.
 • आपल्या भांडवलदाराला ताबडतोब चोरी बाबत सूचित करा आणि आपल्या विमा कंपनी सोबत केस बाबत थेट चर्चा करण्यास सांगा, यामुळे दाव्याची प्रक्रिया जलद होईल.

 • जर पोलीसांनी गाडी पुनर्प्राप्त केली असेल तर आपल्या विमा कंपनीला त्याबद्दल कळवा.
 • जर वाहन पुनर्प्राप्त केले गेले असेल , तर विमा कंपनी आपल्या पॉलिसीच्या नियम व अटींनुसार गाडीला झालेल्या नुकसानीची भरपाई आणि आपल्या पॉलिसीच्या अंतर्गत असलेल्या चोरी झालेल्या गोष्टी असल्यास, त्याच्याही भरपाईसाठी जबाबदार आहे.
 • जर गाडी पुनर्प्राप्त केली गेली नाही तर पोलिसांना नॉन ट्रेसेबल सर्टिफिकेट (एनटीसी) पुरवावे लागेल आणि कोर्टाला कलम 173 सीआरपीएस अंतर्गत अंतर्गत अंतिम अहवाल द्यावा लागेल.
 • आपण जर कार विकत घेण्यासाठी कार कर्ज घेते असेल, तर विमा कंपनी थेट भांडवलदारासह रक्कम निश्चित करेल. समझोता रक्कम विमाकृत घोषित मूल्य (आयडीव्हि) वर आहे. हे तथापि वापर आणि बाजार मूल्याच्या आधारावर भिन्न असू शकते.

PrintPrintEmail this PageEmail this Page

२४ तास जागतिक सहाय्य

आपण परदेशी असताना एखादी आणीबाणी असल्यास आपल्याला कोणत्याही वेळी सहाय्य करण्यासाठी इफ्को-टोकिओ जनरल इन्श्युरन्सने पीएचएम ग्लोबल सोबत प्रतिबद्ध आहे आणि त्यांचा पत्ता आहे 

पॅरामाउंट हेल्थकेअर मॅनेजमेंट प्रा. लि.
प्रवास आरोग्य विभाग
इलाइट ऑटो हाउस, 1 ला मजला,
५४-ए, एम.वासनजी रोड,
चकाला, अंधेरी
मुंबई - ४०००९३
टेलि: ०० ९१ २२ ४०००४२१६ / ४०००४२१९
टोल फ्री: १ ८६६ ९७८ ५२०५ (यूएसए मध्ये)
फॅक्स: ०० ९१ २२ ६७०२१२५९ / २६०
ई-मेल: travelhealth@phmglobal.com
 

इफ्को-टोकिओ जनरल इन्श्युरन्स साठी समर्पित हेल्पलाइन क्रमांक - ००९१ २२ ६७५१५५५१

याव्यतिरिक्त, आपण भेट देत असलेल्या देशाच्या आधारावर आपण खालील टोल फ्री क्रमांक प्राप्त करू शकता

 

मूळ देश

आंतरराष्ट्रीय प्रवेश कोड (+)

UIFN क्रमांक

ऑस्ट्रेलिया 11 800-80008400
ऑस्ट्रिया 0 800-80008400
बेल्जियम 0 800-80008400
चीन 0 800-80008400
डेन्मार्क 0 800-80008400
फिनलँड 990 800-80008400
फ्रान्स 0 800-80008400
जर्मनी 0 800-80008400
हाँगकाँग 1 800-80008400
हंगेरी 0 800-80008400
आयरलँड 0 800-80008400
इस्राइल 14 800-80008400
इटली 0 800-80008400
जपान 001-010 800-80008400
जपान 0033-010 800-80008400
जपान 0061-010 800-80008400
जपान 0041-010 800-80008400
द. कोरिआ 1 800-80008400
द. कोरिआ 2 800-80008400
मलेशिया 0 800-80008400
नेदरलॅन्ड 0 800-80008400
न्यूझीलंड 0 800-80008400
नॉर्वे 0 800-80008400
फिलीपाइन्स 0 800-80008400
पोर्तुगाल 0 800-80008400
सिंगापूर 1 800-80008400
स्पेन 0 800-80008400
स्वीडन 0 800-80008400
स्वित्झर्लँड 0 800-80008400
थायलंड 1 800-80008400
यूके 0 800-80008400

मूळ देशातून यूआयएफएन क्रमांक डायल करण्याची पद्धत

आंतरराष्ट्रीय प्रवेश कोड + यूआयएफएन क्रमांक
उदाहरणार्थ जर आयटीयू यूआयएफएन क्रमांक ८०० ८०००८४०० असेल तर हा क्रमांक डायल करण्याची पद्धत ही आहे
आंतरराष्ट्रीय प्रवेश कोड + ८०० ८०००८४००.
उदा.: ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय कोड आहे ००११, म्हणून वरील क्रमांक
ऑस्ट्रेलियावरून ००११ ८०० ८०००८४०० असा डायल केला जाईल

 

PrintPrintEmail this PageEmail this Page

वैयक्तिक अपघात दावे

 • विमाकर्त्यास तात्काळ सूचना द्या.
 • अपघाती मृत्यू झाल्याच्या बाबतीत, एकूण रक्कम विमा उतरविलेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसा/नियुक्त केलेल्या व्यक्तीस दिली जाते. जर विमा उतरविलेल्या व्यक्तीने नामनिर्देशिताचे नाव दिले नाही तर न्यायालयाकडील वारसाहक्काचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

इतर दाव्यांच्या बाबतीत, विमाकर्ते विमा उतरविलेल्या व्यक्तीचे तज्ञाकडून परिक्षण करून घेऊ शकतात किंवा आवश्यक असल्यास वैद्यकीय मंडळाकडून या प्रकरणाचा संदर्भ घेऊ शकतात, ज्याचे शुल्क विमाकर्त्यांकडून घेतले जाईल.

आग / आयएआर पॉलिसींच्या अंतर्गत दावे

 • प्रथम विमा उतरविलेल्या व्यक्तीने हानी कमी करण्यासाठी सर्व संभाव्य पाउले उचलावित.
 • अग्निशामक दलास तात्काळ सूचित केले जाऊ शकते.
 • दंगल, तोडफोड करणारे कर्मचारी, तृतीय पक्षांद्वारे दुर्भावनापूर्ण नुकसान किंवा दहशतवादी हल्ल्यांपासून उद्भवलेल्या आगीच्या बाबतीत पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
 • शक्य तितक्या लवकर विमाकर्त्यास सूचित करा, कोणत्याही परिस्थितीत २४ तासांनंतर नाही
 • विमाकर्त्याद्वारे नियुक्त केलेल्या सर्वेक्षकाला संबंधित माहितीसह सहाय्यक करा.
 • वादळ, पूर आणि जलप्रपात यामुळे झालेल्या हानीच्या बाबतीत हवामानशास्त्राचा अहवाल मिळवा.
 • जर पॉलिसी 'पुनर्स्थापनेच्या आधारावर' असेल तर नुकसान भरपाईच्या वस्तूंची दुरुस्ती / पुनर्स्थापना पूर्ण केल्यानंतर आणि दाव्याच्या देय रक्कमेसाठी बिले सादर केल्यानंतरच हा दावा सेटल केला जातो.

घरफोडीचे दावे / पैशांचा विमा / निष्ठा

 • तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा आणि वस्तू सापडत नसल्याचे प्रमाणपत्र मिळवा.
 • शक्य तितक्या लवकर विमाकर्त्यास सूचित करा.
 • विमा कंपन्या उपरोक्त बाबीचे पत्र उचित किंमतीच्या स्टँप पेपरवर देण्याचा आग्रह करतील - चोरीची मालमत्ता वसूल केल्यानंतर दाव्याच्या रकमेची परतफेड करण्यासाठी कायदेशीर हक्काचे पत्र.
 • पोलिसांकडून अंतिम अहवाल मिळवा.
 • विमा उतरविलेल्या व्यक्तीने सर्वेक्षकाला संपूर्ण खाते पुस्तिका आणि घटना झाली त्यादिवसाच्या नुकसानाची विवरण बिले प्रदान करावी.

मशीनरी खराब होणे

 • विमाकर्त्यास तात्काळ सूचना द्या
 • निरीक्षणाची व्यवस्था करण्‍यासाठी विमाकर्त्यांकडे दाव्याची सूचना आणि दुरूस्तीच्या अंदाजे खर्च दाखल केला जावा.
 • आंशिक नुकसानाच्या बाबतीत, अवमूल्यन शुल्क आकारले जात नाही परंतु जेव्हा वस्तूंचा त्याच्या त्या दिवसाच्या प्रतिस्थापनेच्या मूल्यासाठी विमा उतरविलेला नसतो तेव्हा त्या वस्तूंना विमा उतरविलेल्या अंतर्गत मानले जाते आणि दाव्याची रक्कम प्रमाणानुसार कमी होते. अवमूल्यन केवळ एकूण हानीच्या दाव्यांसाठी लागू होते.
 • एखाद्या उपकरणाचे अंशतः नुकसान झाल्यास, ते वापरला जाण्यापूर्वी ते दुरुस्त करावे (विमा कंपनीकडून मान्यता मिळाल्यावर), अन्यथा पुढील नुकसान कव्हर केले जात नाही.

विद्युत उपकरणे

 • विमाकर्त्यास तात्काळ सूचना द्या.
 • निरीक्षणाची व्यवस्था करण्‍यासाठी विमाकर्त्यांकडे दाव्याची सूचना आणि दुरूस्तीच्या अंदाजे खर्च दाखल केला जावा.
 • आंशिक हानी झाली असल्यास, मर्यादित जीवनकाल असलेल्या भागांच्या संदर्भात अवमूल्यनासाठी कोणतीही कपात केली जाणार नाही, परंतु कोणत्याही बचावाचे मूल्य विचारात घेतले जाईल.
 • एखाद्या उपकरणाची अंशतः हानी झाल्यास, ते वापरण्यापूर्वी (विमा कंपनीकडून मंजुरी घेऊन) ते दुरुस्त केले जावे, अन्यथा पुढील हानी कव्हर केली जाणार नाही

परिवहनातील घरगुती वस्तू

 • जर कोणतीही हानी परिवहनात झाली असल्याचा संशय असेल तर वाहकास खुल्या वितरणाचा आग्रह केला जावा आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळवावे.
 • जर परिवहनात हानी/नुकसान झाले तर पुनर्प्राप्ती अधिकारांचे संरक्षित करण्यासाठी वेळ मर्यादे अंतर्गत वाहकासोबत पैशांचा दावा संरक्षित केला जावा, ज्याच्याशिवाय दावा दाखल केला जाऊ शकत नाही.

समुद्री परिवहन हानी

 • मूळ इनव्हाइस आणि पॅकिंग यादी - जर इनव्हॉइसचा भाग बनवित असेल तर
 • जर कोणतीही हानी परिवहनात झाली असल्याचा संशय असेल तर वाहकास खुल्या वितरणाचा आग्रह केला जावा आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळवावे.
 • मूळ लॉरी पावती (एलआर)/ ‍लोडिंग बिल (बीएल) - परिवहनात नुकसान झालेल्या किंवा हानी झालेल्या प्रमाणासाठी शेर्‍यासह पात्र.
 • घोषणापत्र पॉलिसीच्या बाबतीत - मालाची घोषणा केली जावी आणि त्याची किंमत एकूण विमा उतरविलेल्या रकमेच्या मर्यादित असावी.
 • परिवहनातील तोटा / नुकसान झाल्यास, पुनर्प्राप्ती अधिकारांचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी मर्यादेच्या आत कॅरिअरसह आर्थिक दावे सादर करावे.
 • वाहकाकडील नुकसान / कमतरतेचे प्रमाणपत्र.
 • हानी/नुकसानाचे स्वरूप, कारण आणि प्रमाण निर्धारित करण्‍यासाठी सर्वेक्षक (विमाकर्त्याद्वारे एकत्रितपणे सहमती असलेला) नियुक्त केला जाणे आवश्यक आहे

Download Motor Policy

Feedback