PrintPrintEmail this PageEmail this Page

आचारसंहिता:-

 •  प्रत्येक परवानाकृत एजंटने खालील निर्दिष्ट आचारसंहितेचे पालन करावे:-

प्रत्येक एजंटने हे करावे:

 • त्याच्या विमा कार्यकारी आणि प्रत्येक निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीच्या चूकी आणि दलालीच्या सर्व क्रियांची जबाबदारी घ्या;
 • विमा कार्यकारी आणि सर्व निर्दिष्ट केलेल्या व्यक्ती ते विपणन करीत असलेल्या विमा उत्पादनांमध्ये योग्यरित्या प्रशिक्षित, कुशल आणि माहितीगार असल्याचे सुनिश्चित करा;
 •  विमा कार्यकारी आणि निर्दिष्ट व्यक्ती ही संभाव्य ग्राहकासमोर पॉलिसी अंतर्गत उपलब्ध पॉलिसी लाभ आणि परताव्यांचे कोणत्याही प्रकारचे चुकीचे सादरीकरण करत नसल्याचे सुनिश्चित करा.
 •  कोणत्याही संभाव्य ग्राहकास एखादे विमा उत्पादन खरेदी करण्याची सक्ती केली जात नसल्याचे सुनिश्चित करा;
 •  विमा उत्पादनाच्या बाबतीत विमाधारकास समाधानकारक विक्रीच्या आधी आणि विक्रीच्या नंतर सल्ला द्या;
 •  एखाद्या विमाधारकास दावा करताना सर्व औपचारिकता आणि दस्तऐजवीकरण पूर्ण करण्यात संभाव्य मदत आणि सहकार्य करा;
 •  एजंट जोखीम कमी करत नाही किंवा विमा कंपनी म्हणून कार्य करीत नाही या तथ्‍याचा योग्य तो प्रचार करा; सेवा स्तराच्या करारनाम्यांमध्ये विमा कंपनीसह प्रवेश करा ज्यामध्ये दोघांची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या निर्धारित केलेल्या आहेत.
 •  प्रत्येक एजंट किंवा विमा कार्यकारी किंवा निर्दिष्ट व्यक्तीने खाली निर्दिष्ट केल्याप्रमाणे आचारसंहिता पाळावी:
  • o प्रत्येक एजंट/  विमा कार्यकारी/ निर्दिष्ट व्यक्तीने हे करावे,------
   • § स्वत:ची आणि तो ज्या कंपनीचे प्रतिनिधीत्व करीत आहे तिची ओळख करून देणे;
   • §  मागणीनुसार संभाव्य ग्राहकास त्याचा परवाना/ प्रमाणपत्र दाखविणे;
   • § त्याच्या विमा कंपनीद्वारे विकल्या जाणार्‍या विमा उत्पादनांच्या संदर्भात आवश्यक माहिती प्रसारीत करा आणि विशिष्ट विमा योजनेची शिफारस करताना संभाव्य गरजा विचारात घेणे;
   • § संभाव्य ग्राहकाद्वारे विचारले गेल्यास, विक्रीसाठी देऊ केलेल्या विमा उत्पादनासंदर्भात दलालीचे प्रमाण उघड करणे;
   • § विक्रीसाठी देऊ केलेल्या विमा उत्पादनासाठी विमाधारकाकडून आकारल्या जाणार्‍या प्रीमियमची सूचना देणे;
   • §  संभाव्य ग्राहकास विमा कंपनीद्वारे प्रस्तावाच्या प्रपत्रामध्ये आवश्यक असलेल्या माहितीचे स्वरूप आणि तसेच एखाद्या विमा कराराच्या खरेदीमधील सामग्रीच्या प्रकटीकरणाचे महत्व देखील स्पष्ट करणे;
   • §  विमा कंपनीकडे सादर केलेल्या प्रत्येक प्रस्तावासह आणि संभाव्य ग्राहकाबद्दल सर्व वाजवी चौकशी करून, कोणतेही भौतिक तथ्‍य जे प्रस्ताव स्वीकारण्याच्या बाबतीत विमा कंपनीच्या विमा घेण्याच्या निर्णयावर विपरित परिणाम करू शकते त्यासह संभाव्य ग्राहकाच्या कोणत्याही विपरीत सवयी किंवा उत्पन्नाची विसंगती एका अहवालाच्या रूपात (''विमा एजंटचा गोपनीय अहवाल'' म्हणून ओळखला जातो) विमा कंपनीच्या लक्षात आणून देणे;
   • §  विमा कंपनीद्वारे प्रस्तावाच्या स्वीकृती किंवा नकाराबद्दल संभाव्य ग्राहकास त्वरित सूचित करणे;
   • §  विमा कंपनीसह प्रस्ताव अर्ज भरताना आवश्यक असलेले दस्तऐवजे आणि नंतर विमा कंपनीकडून प्रस्तावाची पूर्तता करण्‍यासाठी मागणी केलेले इतर दस्तऐवजे मिळविणे;
   • §  विमा कंपनीद्वारे दावे निकाली काढण्यासाठी आवश्यकतांचे पालन करताना पॉलिसीधारक किंवा दावाकर्ते किंवा लाभार्थींना आवश्यक सहाय्यता प्रदान करणे;
   • §  प्रत्येक वैयक्तिक पॉलिसीधारकास नामनिर्देशन किंवा नियुक्ती किंवा पत्ता बदलणे किंवा पर्यायांचा वापर करणे यासंदर्भातील सल्ला द्या, आणि जेथे आवश्यकता असेल तेथे, याबाबतीत आवश्यक ती सहाय्यता करणे;
  • o    कोणत्याही एजंट/विमा कार्यकारी/ निर्दिष्ट व्यक्तीने हे करू नये,--------

    

   • §  वैध परवाना / प्रमाणपत्र नसल्याशिवाय विमा व्यवसायाची विनंती करणे किंवा ती मिळवणे;
   • §  संभाव्य ग्राहकास प्रस्ताव अर्जामध्ये कोणतीही सामग्री माहिती गाळण्यास प्रवृत्त करणे;
   • §  संभाव्य ग्राहकास स्वीकृतीसाठी प्रस्तावपत्र किंवा विमा कंपनीस सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये चुकीची माहिती सादर करण्यास प्रवृत्त करणे;
   • §  संभाव्य ग्राहकाशी असभ्य रीतीने वागणे;
   • § अन्य कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा विमा मध्यस्था द्वारे सादर केलेल्या कोणत्याही प्रस्तावामध्ये हस्तक्षेप करणे;
   • § त्याच्या विमा कंपनीद्वारे देऊ केलेल्या व्याजदरा व्यतिरिक्त इतर दर, लाभ, अटी व शर्ती प्रदान करणे;
   • § लाभार्थीकडून विम्याच्या कराराखाली मिळणार्‍या रक्कमचा हिस्सा मागणे किंवा मिळविणे;
   • §  पॉलिसीधारकाला सध्याच्या पॉलिसीचे निरसन करण्यास भाग पाडणे आणि त्या निरसनाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत त्यांच्याकडून नवीन प्रस्ताव लागू करणे;
   • §  कुठल्याही एजंटकडे अशा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था किंवा संस्थेच्या गटाकडील विमा व्यवसाय करण्याचा पोर्टफोलिओ नसावा ज्या अंतर्गत प्रीमियम कोणत्याही वर्षात मिळवलेल्या एकूण प्रीमियमच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असेल;  
   • § जर नियुक्त व्यक्तीद्वारे त्याचा परवाना रद्द करण्यात आला असेल आणि तो रद्द केल्याच्या तारखेपासूनचा पाच वर्षांचा कालावधी संपला नसेल तर, विमा एजंट म्हणून कार्य करण्यास नवीन परवान्यासाठी अर्ज करा;
   • §  एखाद्या विमा कंपनीचे संचालक व्हा किंवा राहा;
  • o    प्रत्येक एजंट त्याच्या माध्यमातून आधीच प्राप्त झालेल्या विमा व्यवसायाचे जतन करण्यासाठी, पॉलिसीधारकाने तोंडी आणि लेखी स्वरुपात नोटीस देऊन, निर्धारित वेळेत पॉलिसीधारकांकडून प्रीमियमची रक्कम मिळाल्याची खात्री करण्याचा प्रत्येक प्रयत्न करेल.
  • o    एखाद्या कंपनीचा संचालक किंवा फर्मचा भागीदार किंवा मुख्य कार्यकारी किंवा विमा कार्यकारी किंवा विशिष्ट व्यक्तीने, कोणत्याही अन्य विमा कंपनीच्या दुसर्‍या एजंटसह समान पदावर राहू नये.

 


Download Motor Policy

Feedback