PrintPrintEmail this PageEmail this Page

विमा एजंट कसे बनावे?

पात्रता:

 • भारताचे नागरिक
 • वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
 • किमान पात्रता:
  • I  ग्रामीण: - दहावी पास (ग्रामीण पुरावा आवश्यक आहे. हे बीडीओ किंवा सरपंच यांनी दिलेले एक प्रमाणपत्र आहे, ज्यात नमूद असते कि, ती व्यक्ती एका विशिष्ट गावातील रहिवासी आहे ज्याची लोकसंख्या 5000 पेक्षा कमी आहे)
  • II   शहरी: - 12वी पास
 • पॅन क्रमांक
 • करारनाम्यामध्ये प्रवेश करत्यावेळी त्याचा / तिचा कोणताही नातेसंबंधी कुठल्याच प्रकारे कंपनीच्या कोणत्याही क्षमतेच्या हुद्द्यावर कामाला असू नये ("नातेवाईक" मध्ये पती / पत्नी, आश्रित मुले किंवा सावत्र मुले यांचा समावेश असेल मग ते कर्मचा-यांबरोबर राहात असो वा नसो)
 • सदर व्यक्तीकडे दुसऱ्या कोणत्याही जनरल इन्शुरन्स कंपनीचे परवाने नसावे. (जीवन विमा एजंटना संमिश्र प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे)

आवश्यक कागदपत्रे :

 • एजंट अर्जाचा फॉर्म
 • प्रायोजकत्व फॉर्म.
 • जन्म तारखेचा पुरावा
 • पात्रता पुरावा
 • पॅन कार्ड
 • तीन मुद्रांकाच्या आकाराची फोटो
 • पत्त्याचा पुरावा
 • मोबाइल क्रमांक
 • ईमेल पत्ता.
 • जेपीजी स्वरूपात फोटो आणि स्वाक्षरी (फाइलचा आकार फोटोसाठी 50 केबी व स्वाक्षरीसाठी 10 केबी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे).

आयआरडीए प्रशिक्षण:

विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी परवान्याचे अर्ज करणाऱ्या अर्जदाराला आयआरडीए मान्यताप्राप्त संस्थेकडून सामान्य विमा व्यवसायाचे किमान 50 तासांचे व्यावहारिक प्रशिक्षण घ्यावे लागेल, जे एक आठवड्याच्या कालावधीचे असेल. परवान्याचे नवीनीकरण करण्यासाठी, एजंटला फक्त 25 तासांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणाचा खर्च इफको-टोकियो द्वारे केला जाईल

आयआरडीएची परीक्षा:

आयआरडीएचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एजंसीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. एजंटनी भरावयाची परीक्षेची फी 350.00 आहे. डीडी, परीक्षण प्राधिकरणाच्या नावाने असेल, ते म्हणजे ,एनएसई.आयटी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर परीक्षा केंद्र उमेदवारांना मार्क शीट देतील.

परवाना मिळविण्यासाठी उत्तीर्ण उमेदवाराची खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

 • फॉर्म व्हीए
 • एजन्सी करार
 • मार्क शीटची प्रत (परीक्षा केंद्रात दिलेली)
 • परवाना शुल्क (इफको टोकियो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेडच्या नावे उमेदवाराकडून 250.00 चे धनादेश)

Download Motor Policy

Feedback